॥ पांडुरंग विठ्ठल ॥

॥ पंढरपूर ॥

पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातले पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे.

पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.

या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात.

पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात.

पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.

चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व ...

अधिक वाचा >>

॥ पांडुरंग ॥

विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा प्रामुख्याने विष्णु किंवा कृष्णस्वरूप समजला जातो.

परंतु तो काही परंपरांमध्ये तो शिव किंवा बुद्धही मानला जातो. विठोबाच्या प्रतिमा ह्या एका कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात.

विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे.

जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात.

त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १४ लाख भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात.

विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.

Facebook

॥ संतांचा महिमा ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.