॥ दुर्गादेवी आरती ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारीं ॥

वारीं वारीं जन्ममरणातें वारीं । हारीं पडलों आतां संकट नीवारीं ॥ १ ॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे ताअक संजिवनी ॥ ध्रु० ॥

त्रिभुवनीं भुवनीं पाहतां तुज ऐसी नाहीं । चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाहीं । ते तूम भक्तांलागीं पावसि लवलाहीं ॥ जय० ॥ २ ॥

प्रसन्नवदनें प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासुनि सोडीं तोडीं भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ जय० ॥ ३ ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.