लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥ पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥
भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥ अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥
जय देव जय देव जय शंकर सांबा ॥ ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥
जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ॥ सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥
प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ॥ हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव० ॥ २ ॥
गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥ भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥
करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका । तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥
जय देव जय देव जय शंकरा सांबा ॥ ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ३ ॥
कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला । नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ श्रु० ॥
त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा । उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा । नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥
ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी । जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं । मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥
Blogs
-
Ekadashi 2022
-
वैकुंठ चतुर्दशी
-
पंढरपूर पालखी