आपण हे सर्व जाणतो कि भारतात तीर्थक्षेत्राचे किती महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात, तीर्थक्षेत्रास जाणे अवघड होते. त्या वेळी, पायी किंवा बैलगाडीवर प्रवास केला जायचा, थोड्या थोड्या अंतरावर आरामासाठी थांबावे लागत असे.
वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची भेट होत असे, समाजाचे तत्त्वज्ञान मिळत असे. वेगवेगळ्या बोली-भाषा आणि चालीरीती यांचा अनुभव येत असे.खूप बिकट प्रसंगांना सामोरे जावे लागत असे , तर निरनिराळे अनुभव पण येत असे.
एकेकाळी, तीर्थयात्रेवर जाण्याऱ्या एका समूहाने संत तुकाराम महाराजांकडे येऊन सोबत येण्याचा आग्रह केला. तुकाराम महाराजांनी नकार देत त्यांना एक भोपळा दिला व म्हणाले – “बंधूनो, मी तुमच्या सोबत येण्यास असमर्थ आहे, पण तुम्ही हा भोपळा सोबत घेऊन जावा आणि जेथे - जेथे तुम्ही स्नान करचाल, तिथे पवित्र पाण्यात ह्या भोपळ्याला हि स्नान करून आणा.”
लोकांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेताच तो भोपळा घेऊन गेले आणि तीर्थ यात्रे वर जेथे जेथे त्यांनी स्नान केले तेथे त्या भोपळ्याचे ही स्नान करवले, मंदिरात जाऊन दर्शन केले तर भोपळ्याचे ही दर्शन घडवले. या प्रकारे यात्रा पूर्ण करून सर्व परत आले. त्यांनी तो भोपळा संत तुकाराम महाराजांना दिला. तुकाराम महाराजांनी सर्व यात्रेकरूंना, सन्मानार्थ मेजवानीला आमंत्रित केले. तेथे यात्रेकरूंना विविध पकवान देण्यात आले. तीर्थयात्रा करून आलेल्या भोपळ्याची भाजी विशेषतः बनविली होती. सर्व यात्रेकरूंची जेवणास सुरवात केली व म्हणाले – “ही भोपळ्याची भाजी कडू झाली आहे”
संत तुकाराम महाराज आश्चर्य करत म्हणाले – “बंधूनो, ही भाजी तर त्याच भोपळ्यापासून बनवली आहे, ज्याला तुम्ही तीर्थ स्नान करून आणले आहे । हा तीर्थाटनाच्या आधी नक्कीच कडू होता पण तीर्थ दर्शन आणि स्नान करून पण हा कडू आहे, आश्चर्य आहे.”
हे ऐकताच सर्व यात्रेकरूंना समज आला की “आपण तीर्थाटन केले पण आपले मन आणि स्वभाव काही सुधारला नाही तर तीर्थाटनाला काही अर्थ नाही , आम्ही पण एका कडू भोपळ्यासारखे कडू राहून परत आलो ”
॥ महाराष्ट्रातील संत ॥
Blogs
-
संत तुकाराम | दिव्य दृष्टी
-
कानडा राजा पंढरीचा...
-
नाथांचे चमत्कार