॥ श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचा नामबोध ॥

प्रपंचात xस्त्रीने कसे वागावे ?
पतिसेवा हाच आपला धर्म । प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म । अंतरी समाधान हेच आपले साधन ॥ सर्वांनी राहावे सुखी । रामनाम नित्य घ्यावे मुखी ॥ सर्व सुखाचा लाभ । घरबसल्या मिळतो देव ॥ कर्तव्यी असावे तत्पर । मुखी नाम निरंतर ॥ देहाने करावी सेवा । याहून दुजा लाभाचा नाही ठेवा ॥ परमात्म्याने जे जे दिले । ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले ॥ त्या लोभात न गुंतवावे चित्त । हाच परमार्थ सत्य ॥ कोणतेही काम करीत असता । राखावी मनाची शांतता । अगदी व्यवहारबुद्धीने कामे करावी सर्वथा ॥ आप्त‌इष्ट सखेसज्जन । यांचे राखावे समाधान । परी न व्हावे त्यांचे अधीन ॥ सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित न व्हावे कशाने ॥ आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥ अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥
रामावर ठेवावा विश्वास । सुखाने करावा संसार ॥
||हरये नम:| हरये नम:| हरये नम:||

॥ महाराष्ट्रातील संत ॥

Blogs

whatsApp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.