रथसप्तमी
हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृति यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृति सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते.
१. माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो.
२. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे.
रथसप्तमी कथा
पौराणिक कथे नुसार भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा शाम्ब याला आपल्या शारीरिक ताकदीवर खूप गर्व होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आले असता त्यांची शारीरिक दुर्बलता बघून शाम्ब याने तपस्वी दुर्वास ऋषींची खिल्ली उडवली आणि त्यांचा अपमान केला. याने क्रोधीत होऊन दुर्वास ऋषींनी शाम्ब ला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला. शाम्बची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने शाम्बला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. सूर्याची उपासना केल्याने शाम्बची कुष्ठरोगा पासून मुक्तता झाली.
यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा आराधना केल्याने आरोग्य, पुत्र, धन याची प्राप्ती होते. तसेच शारिरिक दुर्बलता, हाडांचा कमकुवतपणा, सांधे दुखी, त्वचेचे विकार दूर होतात. यादिवशी सूर्याची पूजा करून मातीच्या भांड्यात दुध आणि तांदुळाची खीर बनवतात.
॥ महाराष्ट्रातील संत ॥
Blogs
-
नागपंचमी
-
मकरसंक्रांत
-
होळी