एक मनमोहक अशी कथा संत नामदेव यांच्या बालपणाची आहे. संत नामदेवाचे वडील दामाजी पंत हे गावातील विठ्ठल मंदिराची देखभाल करत असत. देवाची पूजा, देवाला नैवैद्य दाखवणे हे सर्व कार्य दामाजी पंत नित्य नियमाने करत असत. एके दिवशी दामाजी पंतांची प्रकृती अचानक खराब झाली, अस्वस्थ वाटत असल्याने ते मंदिरात जाण्यास असमर्थ होते.
दामाजी पंतांनी त्यांची पत्नी गोणाई हीला देवाची पूजा व देवास नैवैद्य दाखवण्यास सांगितले. आज नामदेवाला देवाची पूजा करण्यास पाठवावे असे गोणाई ने दामाजी पंतांना सुचवले. दामाजी पंतांना तिचे बोलने योग्य वाटले आणि त्यानि बाल नामदेवास बोलवले. नामदेवाच्या आइने नैवैद्याचे ताट सजवून नामदेवकडे सोपवले आणि नामदेवाला नैवैद्य दाखवन्यास संगीतले. आज पहिल्या दिवशी संपूर्न भक्तिने अनि श्रधेने पूजा करावी व देवास नैवैद्य दाखवावा असे दामाजी पंतांनी संत नामदेवांना सांगितले.
संत नामदेव मनोमन खूप प्रसन्न झाले आणि त्याच हर्षाने ते विठ्ठलाच्या मंदिराकडे निघाले. मंदिरात पोहचता क्षणी संत नामदेवांनी प्रसादाचे ताट विठ्ठलासमोर ठेवले. सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा विधी उरकून त्यांनी विठ्ठलाला प्रसाद ग्रहण करण्यास सांगितले. त्यांना मनोमन वाटत होते कि आता मूर्तीमधून कोणीतरी येईल आणि प्रसाद ग्रहण करेल. खूप वेळ झाला तरी मूर्तीमधून कोणीही आला नाही, लहान नामदेवाला भीती वाटू लागली, कि माझ्या हातून काही चूक तर झाली नाही ना. बाळ नामदेवाने संपूर्ण पूजाविधी पुन्हा केला आणि विठ्ठलाला पुन्हा प्रसाद ग्रहण करण्याचा आग्रह केला.
मूर्तीमधून कोणीही न आल्याने बाळ नामदेव खूप चिंतीत झाले. खूप वेळ झाला तरीही मूर्ती मधून कोणी येईना, म्हणून बाळ नामदेवाने रडत रडत देवाची विनवणी केली. "रोज आमचे पिता येतात तेव्हा कसे नैवैद्य खाता मग आज मी आलो तर का येत नाही." असे म्हणत नामदेवाने विठ्ठलाकडे प्रसाद ग्रहण करण्यास आग्रह केला.
बाळ नामदेवाचे निश्चल श्रद्धा आणि प्रेमाचे बोलणे ऐकून श्री विठ्ठल स्वतःला अडवू शकले नाहीत. आणि स्वतः श्री विठ्ठल नामदेवासमोर प्रकट झाले. देवाने नामदेवाला स्वतःच्या हाताने भरविण्यास सांगितले. बाळ नामदेव अति प्रसन्न झाले आणि एक एक घास स्वतः विठ्ठलाला भरवू लागले. कधी विठ्ठल नामाला घास भरवत कधी नामदेव विठ्ठलाला. पूर्ण प्रसाद भरवल्यानंतर संत नामदेवांनी विठ्ठलाला नमस्कार केला आणि ते घरी निघाले.
घरी पोहचताच नामदेवाच्या आईने रिकामे ताट पाहून विचारले. "नामा नैवैद्य कोठे आहे". बाळ नामदेवाने सांगितले "तो तर विठ्ठलाने ग्रहण केला." बाळ नामदेवांच्या आई म्हणाल्या "रोज तर विठ्ठल नैवैद्य खात नाहीत मग आज कसा ग्रहण केला". हे सर्व ऐकून नामदेवांचे वडील दामाजी पंत खूप क्रोधीत झाले आणि त्यांनी नामदेवाला मारण्यासाठी छडी उचलली. त्या क्षणी श्री विठ्ठल तेथे प्रकट झाले आणि दामाजी पंतांना नामदेवास मारण्यापासून अडवले.
"नामदेवाची निश्चल भक्ती आणि श्रद्धेमुळे मी प्रसन्न झालो आणि त्याच्या बोलावण्याला मला यावे लागले. हे सत्य आहे आज मी एका भक्ताच्या हातून प्रसाद ग्रहण केला आहे". असे विठ्ठलाने दामाजी पंतांना सांगितले.
संत नामदेवांची भक्ती खूप निर्मळ होती कि स्वतः विठ्ठलाला येऊन प्रसाद ग्रहण करावा लागला.
॥ महाराष्ट्रातील संत ॥
Blogs
-
संत तुकाराम । भोपळ्याची तीर्थयात्रा
-
कीर्तन
-
संत तुकाराम | दिव्य दृष्टी