मराठी अभंग - संत चोखामेळा - अबीर गुलाल उधळीत रंग

॥ अबीर गुलाल उधळीत रंग ॥

 अबीर गुलाल उधळीत रंग ।

 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥

 उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन ।

 रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आम्ही दीन ।

 पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

 वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।

 चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।

 विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥

 आषाढी-कार्तिकी भक्‍तजन येती ।

 पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।

 चोखा म्हणे नाम घेता भक्‍त होती दंग ॥४॥

<< सर्व अभंग

संत चोखामेळा अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.