मराठी अभंग - संत चोखामेळा - धांव घाली विठू आता चालू नको मंद

॥ धांव घाली विठू आता चालू नको मंद ॥

धांव घाली विठू आता चालू नको मंद। बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला। शिव्या देती म्हणती महारा देव बाटविला ॥२॥

अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा। नकाजी मोकलू चक्रपाणि जिमेदारा ॥३॥

जोडुनिया कर चोखा विनवितो देवा। बोलिला उतरी परि राग नसावा ॥४॥

<< सर्व अभंग

संत चोखामेळा अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.