मराठी अभंग - संत चोखामेळा - पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं

॥ पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ॥

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुकुटमणी देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

<< सर्व अभंग

संत चोखामेळा अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.