मराठी अभंग - संत चोखामेळा - सुख अनुपम संतांचे चरणी

॥ सुख अनुपम संतांचे चरणी ॥

सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥

संसारी आसक्‍त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥

चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

<< सर्व अभंग

संत चोखामेळा अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.