मराठी अभंग - संत चोखामेळा - सुखाचें जें सुख चंद्रभागेतटी

॥ सुखाचें जें सुख चंद्रभागेतटी ॥

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥

साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्‍ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥

चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

<< सर्व अभंग

संत चोखामेळा अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.