मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - अधिक देखणें तरी निरंजन पाहणे

॥ अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ॥

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ।

योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥

देहबळी देऊनी साधिलें म्यां साधनीं ।

तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥

अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।

सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥

चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।

तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥

पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।

निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥

ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।

विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.