मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - अरे अरे ज्ञाना झालासी पावन

॥ अरे अरे ज्ञाना झालासी पावन ॥

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।

तुजें तुज ध्यान कळों आले ॥१॥

तुझा तूं चि देव तुझा तूं चि भाव ।

फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥

मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।

कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।

घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

वृत्ती चि निवृत्ति अपणांसकट ।

अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥

निवृत्ति परमानुभव नेमा ।

शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.