मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू

॥ अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ॥

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।

मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।

ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू ।

लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।

सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।

तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.