मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा

॥ घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ॥

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।

भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥१॥

चांदु वो चांदणे । चांपेवो चंदने ।

देवकीनंदने । वीण नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।

कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।

पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे ।

कोकिळें वर्जावें । तुम्हीं बाईयांनो ॥५॥

दर्पणी पाहतां । रूप न दिसे आपुलें ।

बाप रखुमादेवीवरें । मज ऐसें केलें ॥६॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.