मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - कान्होबा तुझी घोंगडी चांगली

॥ कान्होबा तुझी घोंगडी चांगली ॥

कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।आम्हांसि कां दिली वांगली रे ॥१॥

स्व-गत सच्‍चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व-गुणें विणली रे ।

षड्‌-गुण गोंडे रत्‍न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे ॥२॥

षड्‌-विकार षड्‌-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे ।

नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आम्हांसि दिधली रे ॥३॥

ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-वृत्ति विरली रे ।

बाप रखुमादेवी वरे विठ्ठले त्वत्‌-पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.