मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - मी माझें मोहित राहिलें निवांत

॥ मी माझें मोहित राहिलें निवांत ॥

मी माझें मोहित राहिलें निवांत ।

एकरूप तत्‍व देखिलें गे माये ॥१॥

द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं ।

विश्वरुपें मिठी देत हरी ॥२॥

छाया-माया-काया हरिरूपीं ठायी ।

चिंतिता विलया एक तेजीं ॥३॥

ज्ञानदेवा पहा ओहंसोहंभावा ।

हरिरुपीं दुहा सर्वकाळ ॥४॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.