मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या

॥ ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥

जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥

म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥

अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥

मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥

हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ॥

ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥

ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.