मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती

॥ पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ॥

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।

रत्‍नकीळ फांकती प्रभा ।

अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।

न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।

तेणें मज लावियला वेधु ।

खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।

आळविल्या नेदी सादु ॥२॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।

हें तंव कैसेंनि गमे ।

परेहि परतें बोलणें खुंटलें ।

वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥

पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।

उभाचि स्वयंभु असे ।

समोर कीं पाठिमोरा न कळे ।

ठकचि पडिलें कैसें ॥४॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।

म्हणवूनि स्फुरताती बाहो ।

क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।

आसावला जीव राहो ॥५॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.