मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं

॥ रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं ॥

रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं ।

विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥

वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी ।

तुझा वेधु माझे मनी ॥२॥

कटि कर विराजित मुगूट रत्‍न जडित ।

पीतांबरू कासिला तैसा येइ का धांवत ॥३॥

विश्व-रूपे विश्वं-भरे कमळ-नयनें कमळाकरे वो ।

तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.