मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे

॥ तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ॥

तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।

सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥

अनुमाने ना अनुमाने ना ।

श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥

तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।

स्थूळ-सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥

तुज आकारू म्हणों कीं निराकारू रे ।

आकारू-निराकारू एकु गोविंदु रे ॥४॥

तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।

दृश्याअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥

तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे ।

व्यक्त-अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥

निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।

बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.