मराठी अभंग - संत एकनाथ - आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु

॥ आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु ॥

आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु

आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥

आम्हां धातु विठ्ठल मातु विठ्ठलु गातु विठ्ठलु आनंदे ॥२॥

आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥

आम्हां ताल विठ्ठलु मेल विठ्ठलु कल्लोळ विठ्ठलु कीर्तने ॥४॥

आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु मत्ता विठ्ठलु वदनी ॥५॥

आम्हां मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु एका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.