मराठी अभंग - संत एकनाथ - असा कसा देवाचा देव बाई ठकडा

॥ असा कसा देवाचा देव बाई ठकडा ॥

असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।

देव एका पायाने लंगडा ॥१॥

शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो ।

करी दही-दुधाचा रबडा ॥२॥

वाळवंटी जातो कीर्तन करितो ।

घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥

एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई ।

देव एकनाथाचा बछडा ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.