मराठी अभंग - संत एकनाथ - आवडीनें भावें हरिनाम घेसी

॥ आवडीनें भावें हरिनाम घेसी ॥

आवडीनें भावें हरिनाम घेसी ।

तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥

नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।

पती लक्षुमीचा जाणतसे ॥२॥

सकळ जिवांचा करितो सांभाळ ।

तुज मोकलील ऐसें नाही ॥३॥

जैसी स्थिति आहे तैशापरी राहे ।

कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥

एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।

हरिकृपें त्याचा नाश आहे ॥५॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.