मराठी अभंग - संत एकनाथ - देवासी तो पुरे एक प्रेमभाव

॥ देवासी तो पुरे एक प्रेमभाव ॥

देवासी तो पुरे एक प्रेमभाव । 

पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥

मनापासूनियां करितां कीर्तन ।

आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥

रामकृष्णहरी उच्‍चार सर्वदा ।

कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥

एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास ।

सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.