मराठी अभंग - संत एकनाथ - कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल

॥ कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल ॥

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल ।

कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥

कानडा विठ्ठल नामें बरवा ।

कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥

कानडा विठ्ठल रूपे सावळां ।

कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥

कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी ।

कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥

कानडा विठ्ठल कानडा बोले ।

कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥

वेधियेलें मन कानड्यानें माझें ।

एका जनार्दनीं दुजें नाठवे चि ॥६॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.