मराठी अभंग - संत एकनाथ - काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल

॥ काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ॥

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥

भाव-भक्ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥

दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥

ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥

दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥

देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.