मराठी अभंग - संत एकनाथ - माझे माहेर पंढरी

॥ माझे माहेर पंढरी ॥

माझे माहेर पंढरी ।

आहे भीवरेच्या तीरी ॥१॥

बाप आणि आई ।

माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलीक राहे बंधू ।

त्याची ख्याती काय सांगू ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।

करितसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनी शरण ।

करी माहेरची आठवण ॥५॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.