मराठी अभंग - संत एकनाथ - ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था

॥ ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।

अनाथाच्या नाथा, तुज नमो ।

तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥

नमो मायबापा, गुरुकृपाघना ।

तोडी या बंधना मायामोहा ।

मोहोजाळ माझे कोण नीरशील ।

तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥

सद्गुरुराया माझा आनंदसागर ।

त्रैलोक्या आधार गुरुराव ।

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।

ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।

रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।

स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥

एका जनार्दनी गुरू परब्रह्म ।

तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.