मराठी अभंग - संत एकनाथ - राम नाम ज्याचें मुखी

॥ राम नाम ज्याचें मुखी ॥

राम नाम ज्याचें मुखी ।

तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥

राम नाम वदता वाचें ।

ब्रह्म सुख तेथें नाचे ॥२॥

राम नामें वाजे टाळी ।

महादोषां होय होळी ॥३॥

राम नाम सदा गर्जे ।

कळी-काळ-भय पाविजें ॥४॥

ऐसा राम नामी भाव ।

तया संसाराची वाव ॥५॥

आवडीने नाम गाय ।

एका जनार्दनी वंदी पाय ॥६॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.