मराठी अभंग - संत एकनाथ - सत्वर पाव ग मला भवानी आई

॥ सत्वर पाव ग मला भवानी आई ॥

सत्वर पाव ग मला भवानी आई

रोडगा वाहीन तुला

सासरा माझा गावी गेला

तिकडेच खपवी त्याला

भवानी आई, रोडगा वाहीन तुला

सासू माझी जाच करिते

लवकर न्येई ग तिला

भवानी आई, रोडगा वाहीन तुला

जाऊ माझी फडाफडा बोलते

बोडकी कर ग तिला

भवानी आई, रोडगा वाहीन तुला

नणंदेचं कार्टं किरकिर करतं

खरूज येऊ दे त्याला

भवानी आई, रोडगा वाहीन तुला

दादला मारून आहुति देईन

मोकळी कर ग मला

भवानी आई, रोडगा वाहीन तुला

एका जनार्दनी सगळेच जाऊ दे

एकटीच राहू दे मला

भवानी आई, रोडगा वाहीन तुला

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.