मराठी अभंग - संत एकनाथ - विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान

॥ विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान ॥

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान ।

नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥

आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत ।

कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥

विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म

विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल भरला ।

भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.