केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ १ ॥
झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ २ ॥
न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेव ॥ ४ ॥
संत गोरा कुंभार अभंग
- अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य
- एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित
- स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं
- सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन
- कायसास बहु घालिसील माळ । तुज येणेविण काय काज
- मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना
- निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी
- रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई