मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥
आनंदी आनंद गिळूनि राहणें । अखंडित होणें न होतिया ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें । जग हें करणें शहाणें बापा ॥ ४ ॥
संत गोरा कुंभार अभंग
- निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे
- रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी
- देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर
- श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम
- नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी
- कायसास बहु घालिसील माळ । तुज येणेविण काय काज
- सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन
- अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई