मराठी अभंग - संत गोरा कुंभार - नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी

॥ नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥

तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥

याही शब्दामाजी वाचा न लागे । मार्ग पैं गा लागे निर्धारिता ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा । चिद्रूप अवघा दिससी साच ॥ ४ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.