मराठी अभंग - संत गोरा कुंभार - रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी

॥ रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥

रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥ १ ॥

पुंडलिका झाला अनुताप । धन्य सत्य गुरु माय बाप ॥ २ ॥

जन्मा येऊनियां काय केली करणी । व्यर्थ शिणविली जननी ॥ ३ ॥

नऊ महिने ओझें वागऊन । नाहीं गेला तिचा शीण ॥ ४ ॥

ऐसा झालो अपराधी । क्षमा करा कृपानिधी ॥ ५ ॥

ऐसा पुंडलिका भाव । उभा केला पंढरीराव ॥ ६ ॥

भक्त पुंडलिकासाठी । उभा भिंवरेच्या तटी ॥ ७ ॥

कटावरी ठेवूनी कर । उभा विटेवरी नीट ॥ ८ ॥

ऐसा भाव धीर म्हणे गोरा । तीर्था जा फजितखोरा ॥ ९ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.