स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥ १ ॥
माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार नवल झालें नाम्या । भेटी तुह्मां आह्मां उरली नाहीं ॥ ३ ॥
संत गोरा कुंभार अभंग
- वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी
- देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर
- श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम
- कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें
- केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥
- रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी
- केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान
- सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई