आम्हीं जावें कवण्या ठायां ।
न बोलसी पंढरीराया ॥१॥
सरिता गेलीं सिंधूपाशीं ।
जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
जळ कोपलें जळचरासी ।
माता न घे बालकासी ॥३॥
जनी म्हणें आले शरण ।
जरी त्वां धरिलेंसें मौन्य ॥४॥
संत जनाबाई अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई