मराठी अभंग - संत जनाबाई - दळिता कांडिता । तुज गाईन अनंता

॥ दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥

दळिता कांडिता ।

तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी ।

तुझे नाम गा मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार ।

मुखी हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी ।

तू बा सखा चक्रपाणि ॥४॥

लक्ष लागले चरणासी ।

म्हणे नामयाची दासी ॥५॥

<< सर्व अभंग

संत जनाबाई अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.