मराठी अभंग - संत जनाबाई - जनी म्हणे पांडुरंगा

॥ जनी म्हणे पांडुरंगा ॥

जनी म्हणे पांडुरंगा ।

माझ्या जीवींच्या जिवलगा ।

विनविते सांगा ।

महिमा साधुसंतांचा ॥१॥

कैसी वसविली पंढरी ।

काय महिमा भीमातीरीं ।

पुंडलिकाच्या द्वारीं ।

कां उभा राहिलासी ॥२॥

कैसा आला हा गोविंद ।

कैसा झाला वेणुनाद ।

येउनी नारद कां राहिला ॥३॥

कृपा करा नारायणा ।

सांगा अंतरींच्या खुणा ।

येऊं दे करुणा ।

दासी जनी विनवितसे ॥४॥

<< सर्व अभंग

संत जनाबाई अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.