मराठी अभंग - संत जनाबाई - ज्याचा सखा हरी

॥ ज्याचा सखा हरी ॥

ज्याचा सखा हरी ।

त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥

उणें पडों नेदी त्याचें ।

वारे सोसी आघाताचें ॥२॥

तयांवीण क्षणभरी ।

कदा आपण नव्हे दुरी ॥३॥

अंगा आपुले ओढोनी ।

त्याला राखतो निर्वाणी ॥४॥

ऐसा अंकित भक्‍तांसी ।

म्हणे नामयाची दासी ॥५॥

<< सर्व अभंग

संत जनाबाई अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.