मराठी अभंग - संत जनाबाई - संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ॥

॥ संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ॥ ॥

संतभार पंढरीत ।

कीर्तनाचा गजर होत ॥१॥

तेथ असे देव उभा ।

जैसी समचरणांची शोभा ॥२॥

रंग भरे कीर्तनात ।

प्रेमे हरिदास नाचत ॥३॥

सखा विरळा ज्ञानेश्वर ।

नामयाचा जो जिव्हार ॥४॥

ऐशा संता शरण जावे ।

जनी म्हणे त्याला ध्यावे ॥५॥

<< सर्व अभंग

संत जनाबाई अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.