मराठी अभंग - संत कान्होपात्रा - जिवीची जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई

॥ जिवीची जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई ॥

जिवीची जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई ।
सांवळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।१।।
आला अपवाद याती संबंध लौकिक पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।२।।
दीनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।३।।
शरण कान्होपात्रा तुजला वेळोवेळा पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।४।।

<< सर्व अभंग

संत कान्होपात्रा अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.