जिवीची जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई ।
सांवळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।१।।
आला अपवाद याती संबंध लौकिक पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।२।।
दीनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।३।।
शरण कान्होपात्रा तुजला वेळोवेळा पाही ।
सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।४।।
संत कान्होपात्रा अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई