संत नामदेव

॥ संत नामदेव माहिती ॥

मूळ नाव : नामदेव

जन्म : इ.स. २६ ऑक्टोबर १२७०, नरसी-बामणी, हिंगोली, महाराष्ट्र

निर्वाण : जुलै ३, इ.स. १३५०

गुरू : विसोबा खेचर

समाधिमंदिर : पंढरपूर

उपास्यदैवत : विठ्ठल

भाषा : मराठी भाषा

साहित्यरचना : नामदेवांची गाथा, अभंग

वडील : दामाशेटी

आई : गोणाई

विशेष माहिती :
पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई
नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई


संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व हिंदुस्तानी भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. संत नामदेव हे मराठी तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि कीर्तना च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

दामाशेटी हे संत नामदेव यांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. संत नामदेव यांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. स्वत:ला संत नामदेव यांची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

अगदी लहानपणापासूनच संत नामदेव विठ्ठलमय झाले होते. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने नैवेद्य (संत नामदेव आणि श्री विठ्ठल प्रसाद) सेवन केला सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव यांचे जन्म गाव होय. संत नामदेव यांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेव यांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले.

संत नामदेव उत्तर भारतात गेले असल्याची प्रमाणे अनेक प्रकारे मिळतात.विशेषतःपंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळते. ‘नामदेवजीकी मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली संत नामदेव यांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत.त्यांतील ३ विवक्षित पदे अन्य कवींची आहेत, असे एक मत आहे. संत नामदेव यांच्या हिंदीवर मराठीची छाप तर आहेच; परंतु व्रज,अवधी,राजस्थानीअशाभाषांचेही संस्कार आहेत.

संत ज्ञानेश्र्वर यांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेव यांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग- अशी त्यांची योग्यता होती. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

अशी आख्यायिका आहे, की संत नामदेव विसोबांना भेटावयास गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून निजले होते.तेदृश्यपाहून संत नामदेव यांना चीड आली व त्यांनी विसोबांची निर्भर्त्सना केली; परंतु विसोबांनी देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव, असे म्हटल्यावर ‘देवाविण ठाव हे बोलणेचि वाव’ हाविचार संत नामदेव यांच्या मनालाभिडला.गुरूपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला.

भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेव यांनी संत ज्ञानेश्र्वर यांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील शबदकीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्ढा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही यांची मंदिरे उभारलेली आहेत. 'संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

ऐंशी वर्षांचे वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरविले . संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलमंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. विठ्ठलदर्शनासाठी येणाऱ्या साधु-संतांच्या, चरण धूळ आपल्या मस्तकी लागावी, ही त्यांची इच्छा असल्यामुळे विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीखालीच हे समाधिस्थान तयार करण्यात आले.

॥ संत नामदेव अभंग ॥

whatsApp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.