मराठी अभंग - संत नामदेव - आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।

॥ आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।। ॥

आधी रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥

जेव्हा नव्हते चराचर ।
तेव्हा होते पंढरपूर ॥२॥

जेव्हा नव्हती गोदा गंगा ।
तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥

चंद्रभागेचे तटी ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥

नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥

असे सुदर्शनावरी ।
म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥

नामा म्हणे बा श्रीहरी ।
आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.