मराठी अभंग - संत नामदेव - नामाचा गजर गर्जे भीमातीर

॥ नामाचा गजर गर्जे भीमातीर ॥

नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महीमा साजे थोर तुज एका ॥१॥

ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी ॥२॥

चारी वेद भाट होऊनी गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥

सुरवरांचे भार अंगणी लोळती ।
चरणरज क्षिति शिव वंदी ॥४॥

नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू ।
करितो सांभाळु अनाथांचा ॥५॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.