मराठी अभंग - संत नामदेव - पक्षिणी प्रभाति चारियासी जाये

॥ पक्षिणी प्रभाति चारियासी जाये ॥

पक्षिणी प्रभाति चारियासी जाये ।
पिलुवाट पाहे उपवासी ॥१॥

तैसे माझे मन धरी वो तुझी आस ।
चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥

तान्हे वत्‍स घरी बांधिलेस देवा ।
तया हृदयी धावा माऊलीचा ॥३॥

नामा म्हणे देवा तू माझा सोयरा ।
झणि मज अव्हेरा अनाथ नाथा ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.