मराठी अभंग - संत नामदेव - पंढरी निवासा सख्या पांडुरंगा

॥ पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ॥

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्ताचिया ॥१॥

भक्त कैवारीया होसी नारायणा ।
बोलता वचन काय लाज ॥२॥

मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण आली धाड ॥३॥

वारंवार तुज लाज नाही देवा ।
बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.